मुंबई | राम कदम यांच्या वक्तव्यावर आ. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

  • 6 yıl önce
तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. घाटकोपरमध्ये काल दहीहंडी उत्सवात राम कदम बोलत होते.

"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.