News Of The Day | ह्याला म्हणतात भारतीय जवान | 19 तास पायपीट करीत चिन्यांना हुसकावले | Lokmat News

  • 3 years ago
चिनी सैनिक भारतीय हद्दीत शिरून रस्ते बांधत असल्याची माहिती मिळताच भारतीय जवानांनी तब्बल १९ तास पायपीट करीत अरुणाचल प्रदेशातील तूतिंग भागातून चिनी सैनिकांना हुसकावून लावले.बहाद्दर सैनिकांनी रक्त गोठविणारी हिमवृष्टी, हिम वादळाची पर्वा न करता मॅकमोहन रेषेवरील सीमा गाठली आणि चिन्यांना पळवून लावले. एका स्थानिकाने दिलेल्या माहिती नंतर तातडीने भारतीय सैनिकांची एक तुकडी मॅकमोहन रेषेच्या दिशेने रवाना झाली. चिन सीमेवरील भागात रस्त्यांचे जाळे नसल्याने या भागात भारतीय सैनिकांना चालतच जावे लागले. आवश्यक शस्त्रसामुग्री आणि चिजवस्तूंसह सतत १९ तास चालत सैनिक जेंव्हा सीमेवर पोहोचले तेंव्हा बांधकाम साहित्य आणि चिनि मजूरांचा तांडा हिंदुस्थानी हद्दीत खूप आतपर्यंत कार्यरत असल्याचे आढळून आले. त्यांना माघारी चिनच्या हद्दीत पिटाळून हिंदुस्थानी सैन्याने सीमेवर चौकी उभारली आहे. तेथे १२० सैनिक एक महिना मुक्काम करणार आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended