रजनीकांतची वेबसाईट आणि ३ लाख लोकांची नोंदणी | Lokmat Latest Update | Lokmat News

  • 3 years ago
रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड या माणसाचे वलय एखाद्या ‘सुपरस्टार’ पेक्षाही अधिक आहे. कमल हासन यांनी राजकारण प्रवेशाची घोषणा केल्यानंतर 31 डिसेंबरला ‘थलैवा’ रजनीकांत यांनीही राजकारणात प्रवेशाची घोषणा केली. त्यांनी जगभरातील आपल्या चाहत्यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी एक वेबसाईटही तयार केली. ‘रजनीमंद्रम डॉट ओआरजी’ या वेबसाईटवर नोंदणी करून कुणीही रजनीकांत यांना पाठिंबा दर्शवू शकतो. रजनी यांनी या वेबसाईटची आणि अॅपची घोषणा करताच अवघ्या काही तासांमध्येच तीन लाख लोकांनी या वेबसाईटवर नोंदणी केली. या व्यतिरिक्‍त सुमारे 50,000 अनधिकृत रजनीकांत फॅन क्‍लब आहेत. ज्यांच्यावरही रजनी यांचे चाहते  सक्रिय झाले आहेत. अँड्राइड मोबाईलमध्ये रजनीकांत यांच्या पार्टीचे अधिकृत अॅपप्लिकेशन आहे. या ऍपवरूनही त्यांचे समर्थक त्यांना पाठिंबा दर्शवू शकतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended