"थँक यू विठ्ठला" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला | मनोरंजनाची माहिती | लोकमत मराठी न्यूज

  • 3 years ago
मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. असाच वेगळ्या आशय आणि विषयाच्या ‘Thank U विठ्ठला’ या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा अभिनेता–दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते उत्साहात नुकताच संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांनी केली असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे. येत्या ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हे पहायचं की विठ्ठल यांना “You Welcome” म्हणतो की नाही”

Recommended