PUNE EXCISE ACTION राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केलीय | Sakal Media |

  • 3 years ago
PUNE EXCISE ACTION

बातमी आहे पुण्यातून. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केलीय. स्थानिक कारवाईचे धागेदोरे थेट गुजरातमध्ये लागल्याने थेट कंपनीच सील करण्याची धडाकेबाज कारवाई केलीय. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्याने अनधिकृत मद्य विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणलेय. गुजरात येथील वळसाड मधील एक कारखाना स्थानिक कारवाईत सहभागी असल्याचं तपासात समोर आलं होतं. पुण्यात ताडी निर्मिती करणाऱ्यावर कारवाई गुजरात कनेक्शन समोर आलं होतं. त्यानुसार पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट गुजरातमध्ये संबंधित कारखाना सील करत कारवाई केलीय. त्यात साडेतीन लाखाहून अधिक मुद्देमाल हस्तगत केलाय.

बाईट - संतोष झगडे - पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended