‘Archie’ Effect - Lathi charge to control crowd in Bhosari
  • 8 years ago
एखाद्याला डोक्यावर घेतले की मग त्याच्यासाठी वाट्टेल तर करण्यास तरुणाई तयार असते. वेळप्रसंगी त्याच्यासाठी मार खाण्यासही मागेपुढे बघितले जात नाही. असाच अनुभव सध्या सैराटफेस आर्ची आणि परश्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना येतो आहे. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना बघण्यासाठी तरुणाई बेभान होते आणि मग कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आयोजकच अडचणीत येतात. भोसरीमध्येही गुरुवारी याचाच प्रत्यय आला.