Lakh Lakh Chanderi, Episode 18 | Shashi Kapoor

Try Our New Player
Jaimaharashtra
35
74 views
  • About
  • Export
  • Add to
कपूर घराण्यातला राजबिंड, देखणा हॅण्डसम हिरो म्हणजे शशी कपूर ....शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली...काही पौराणिक सिनेमांसह त्यांनी मीना, तदबीर, बचपन यासारख्या व्यावसायिक सिनेमांची वाट धरली मात्र बालकलाकार म्हणून ते नावारुपाला आले ते आवारा आणि आग सिनेमातून...तर धर्मपुत्र या सिनेमातून त्यांनी प्रमूख भूमिका साकारण्याला सुरुवात केली...यानंतर त्यांनी प्रेमपत्र, चार दिवारी यासारख्या फिल्मस केल्या मात्र कपूर नाव पाठीशी असूनही यश अजून त्यांच्यापासून चार हात लांबच होतं. अशातच मग त्यांनी इंग्रजी भाषेतील फिल्मस करण्यासाठी प्राधान्य दिलं...The householder आणि shekespeare-wallah या फिल्मस त्यांनी केल्या आणि यशाची पहिली चव त्यांनी चाखली...आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांमध्ये कपूर कुटुंबातील या स्ट्रगलर अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं...मात्र आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये चुणूक दाखवूनही बॉलिवूडमध्ये शशी कपूर अजूनही यशासाठी चाचपडतच होते... हिंदी सिनेमांमधली कोणतीही अभिनेत्री त्या काळात शशी कपूर यांच्यासह काम करण्यासाठी तयार नव्हतं असंही बोलल जातं मात्र सिल्व्हर स्क्रीनवर अभिनेत्री नंदा यांनी शशी कपूर यांचा हात धरला आणि त्यांच्यासह 8 फिल्मस साईन केल्या....यानंतर शशी कपूर नावाचा झंझावत हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाहायला मिळाला.. भूमिकेमध्ये वैविध्य जपत त्यांनी अनेक हिट फिल्मस दिल्या तसंच दिग्दर्शन आणि निर्मितीचीही वाट चोखाळली....

0 comments